त्याचं नि माझं कित्येक वर्षांपूर्वी हे ठरलं होतं!
मृत्यू!
मृत्यू म्हणजे एक्झॅक्टली काय?
मानसिक स्तरावर ती अवस्था कशी असेल? मृत्यूनंतर माणसाचं खरं काय होतं?
आत्मा उरतो का? केल्या पाप-पुण्याची फळं भोगण्यासाठी तो स्वर्ग- नरकात जात असेल, का काही
उरतच नसेल?
असले विषय गप्पांचे. त्यामुळे आम्ही दोघंच एकमेकांना!
मला कोणी मित्र नाही; त्याला कोणी नाही.
म्हणूनच आमचं ठरलं... एकदम पक्कं ठरलं!
आमच्या दोघांपैकी जो आधी मरे...