हे मूल आपल्या कुशीत जन्माला आलेलं नाही... आपण ते दत्तक घेतलं आहे... त्याचा आपल्याला
मुलासारखा सांभाळ करायचा आहे...
आपण त्याची जन्मदाती आई नाही आहोत, हे त्याला कधी जाणवता कामा नये...
असं सगळं मनाला बजावून, त्यानुसार वर्तणूक करायची, म्हणजे भूमिका निभावणंच की ते, एका
प्रकारे! स्वत:च्या मुलाबाबत ज्या मातृसुलभ उत्स्फूर्तपणे या भावना स्वत:च्याही नकळत मनात
स्रवू शकतील-पाझरू शकतील, त्या या भूमिकेशी बेमालूमपणे ...