आय.एस.सी.त त्याला भेटला शेखर पालेकर. हा शेखर म्हणजे बेस्ट सेल्समनचा खिताब मिळालेला एकदम टॉप पफॉर्मर वगेरे! सुस्वभावी शेखरची कंपनीतल्या सगळ्यांशीच मैत्री असली तरी तो त्यांच्याशी एक विशिष्ट अंतर राखून वागायचा. सुरेख राजदत्तशी त्याची इतरांपेक्षा थोडी खास मैत्री होती, अगदी तो सुरेखच्या वाढदिवसाला त्याच्या घरी गेला इतपत! सुरेखलाही शेखर मित्र म्हणून फार आवडला होता. पण त्याच्याशी बोलताना सुरेखला त्याच्या...