खरंच.... तो रोगट सुरेंद्र अधिकारी मेला... काय होईल?
वाईट काहीच नाही!
रोगट शरीरापासून त्याची सुटका होईल.
संमोहिनी त्याच्या बंधनातून मुक्त होईल.
आपलं आयुष्य मार्गी लागेल!
मग सुरेंद्र का मरणार नाही?
आपण स्वत: कुठेही न अडकता, संमोहिनीला संशय येऊ न देता, सुरेंद्र अधिकारी हा 'वृद्ध तरुण'
मरू शकतो का?
याचाच दुसरा अर्थ असा संमोहिनी कायमसाठी आपली होऊ शकते!
हे फार महत्त्वाचं.
कोणाला, खुद्द सुरेंद्र नि संमोहिनीलाही मा...