अपत्त्यावर पहिला अधिकार पित्याचा की मातेचा? बीजाचा की क्षेत्राचा? महाभारतात उद्भवलेला हा प्रश्न. डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी मन्वंतर काळाची पार्श्वभूमी घेऊन या प्रश्नावर चर्चा केली आहे. वेदविद्यापारंगत श्रीनिवास श्रोत्री भागीरथम्मा - लक्ष्मी, इतिहास संशोधक सदाशिव - नागलक्ष्मी करुणारत्ने आणि साहित्याचा प्राध्यापक राज - कत्त्यायनी नंजुंड यांच्या नातेसंबंधांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा हा प्रश्न कसाला लाग...