माणूस आयुष्यात आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना अनेक समस्यांशी झगडत असतो. या समस्यांशी झगडताना अनेकदा तो अडखळतो, दु:खी-कष्टी बनतो तर कधी मानसिक स्वास्थ्य हरवून बसतो. अशावेळी आपल्या आयुष्याकडे सकारात्मकतेनं कसं पाहावं, त्यातील गुंते सोडवताना मनस्वास्थ्य कसं टिकवावं, आयुष्याचा अर्थ काय आहे? इ. प्रश्नांची उकल करण्यासाठी हे ऑडिओबुक मदत करतं.