उद्योजिका होण्याचं ध्यानीमनी नसताना एखादी गृहिणी एक यशस्वी उद्योजिका होते, उद्योगही असा निवडते की त्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खत तयार होईल, खेड्यापाड्यातल्या अनेक महिलांना रोजगार मिळेल. ग्राहकांना रसायनमुक्त अन्नधान्य मिळेल आणि अशा रीतीने उद्योगाची सर्वांगीण भरभराट होत राहील. 'विवम अॅग्रोटेक'च्या संस्थापिका आणि संचालिका निर्मला कांदळगावकर आणि त्यांच्या उद्योगाची ही कहाणी जितकी कौत...