पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील लिखित 'मन में है विश्वास' या आत्मकथनपर पुस्तक, स्वतःविषयी खरं लिहिणं हा जीवघेणा अनुभव असतो तरीही विश्वास नांगरे-पाटील यांनी स्वतःला मोकळेपणी व्यक्त केलंय. आपल्या कुटुंबाची, समाजाची पुनर्तपासणी केलीय, नात्यागोत्यातील उभ्या-आडव्या धाग्यांचा छेद घेऊन उकल केलीये. अत्यंत प्रत्ययकारी भाषेत असलेले हे आत्मकथन लेखकाच्या प्रगल्भ मनाची जाणीव करून देते.