शाळा, कॉलेज, किंवा अगदी फेसबुकवरही तुम्ही गांधी आणि सावरकरांच्या इतिहासाबद्दल तावातावाने चर्चा करता? इतिहासाचे दाखले देत मुद्दयांवर भांडता? बोलत, भांडत असाल तर तुमचं काहीही चुकत नाहीये...कारण हे दोन महापुरुष भारतात किंवा जगभरातही चर्चांच्या बाबतीत सगळ्यात हिट आणि ट्रेंडिग असतात, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणूनच त्यांच्याबद्दल, त्यांच्या राजकीय इतिहासाबद्दल, धर्मचिंतनाबद्दल तपशीलात जाणून घे...