बोक्याचा बाबा काही दिवसांपासून टेंशनमध्ये दिसत होता. बोक्यानं आजीच्या, दादाच्या मदतीनं बाबाला नेमका कसला त्रास होतो आहे, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. पण बाबा काही दाद लागू देत नव्हता. आता बोक्या कोणती युक्ती वापरून, बाबाचा ताण समजून घेईल, बाबाला मदत करण्याचं त्याचं हे मिशन फत्ते होईल का? ऐका 'बोक्या सातबंडे' भाग - 8, दिलीप प्रभावळकरांसोबत!