बोक्या आणि त्याचा मित्र संदीप सोरट गेलेत कॉलनीतल्या चावरे काकांकडे. गणेशोत्सवासाठी वर्गणी मागायला गेले असताना बोक्या आणि संदीपला, चावरे काकांच्या घरी एका बंद खोलीत कुणी तरी वावरत असल्याचा, कण्हल्याचा आवाज ऐकू येतो. चावरे काक-काकू आतल्या खोलीत गेले असताना हे दोघं हळूच त्या कुलूपबंद खोलीजवळ जाऊन आत काय असेल, याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करतात. तेवढ्यात चावरे काका बाहेर येऊन दोघांना ओरडतात. त्यामुळे हे...