बोक्या सातबंडे हा दिलीप प्रभावळकर यांचा मानसपुत्र. तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही आणि खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करायला आणि ढोंगी माणसाच्या वर्मावर बोट ठेवायला त्याला आवडतं. तर असा हा खट्याळ बोक्या सातबंडे प्रत्येक संकटातून नि अग्निदिव्यातून मात्र सहीसलामत सुटतो. कसा? ते या गोष्टीतून तुम्हाला कळेलच. पण या तुमच्या लाडक्या दोस्ताचं खरं नाव मात्र बोक्या सातबंडे नाही...