चटपटीत खायची इच्छा झाली की वडापाव, समोसा हे पदार्थ आलेच. त्यातही समोसा म्हणजे अनारसे - हे समीकरण समोसाप्रेमींसाठी अजिबात नवं नाही. तीन दशकांपुर्वी पुण्यातल्या सदाशिव पेठेत टेबल टाकून समोसे विकणाऱ्या संगीता अनारसे आणि त्यांच्या कुटुंबियांनी तेव्हाचा तो छोटासा व्यवसाय कसा विस्तारला आणि नावारुपाला आणला, त्याचीच ही गोष्ट!