विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकाने काय भोगले याची गाथा सव्यसाची मध्ये ग्रंथीत झाली आहे. नवी अर्थव्यवस्था आणि त्या अनुषंगाने ढवळून निघालेली जुनी व्यवस्था आणि मूल्ये , राजकारणाचा झालेला अधः पात आणि गुन्हेगारीकरण , धार्मिक तेढ वाढवत त्यांचा धंदा करणारे दलाल, आणि या सोबत असहाय्यपणे या नव्या वातावरणाशी जुळवत, नवी स्वप्ने पाहत फरफटणारा संभ्रमित समाज याचे विराट दर्शन या महाकादंबरीत घडते. सर्वव्यापकता एवढे...