१९६३ साली 'पूर्वरंग'ची पहिली आवृत्ती प्रसिध्द झाली. तिसर्या आवृत्तीच्या निमित्ताने माझे हे पुस्तक वाचताना वाटले की पुन्हा एकदा ह्या देशांतून हिंडून यावे. ज्या स्थळांची मनावर त्या काळी उमटलेली चित्रे आजही ताजी आहेत ती स्थळे पुन्हा एकदा पाहून यावे. पण असेही वाटले की न जाणो मनावर उमटलेली त्या काळातली चित्रे आणि बदललेल्या परिस्थितीत आज ती ठिकाणे ज्या स्वरूपात उभी आहेत ती चित्रे जर एकमेकांशी जुळली नाह...