व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आणि आपली तत्वं प्राणपणाने जपणारा बाप, मुलीच्या आंतरजातीय लग्नाला पाठिंबा देतो. होणारा जोडीदार दलित असल्याने या लग्नाला आईचा विरोध तर जात-पात न मानणाऱ्या वडिलांचा पाठिंबा. या द्वंद्वातून मुलगी लग्न तर करते, पण पुढे काय होतं…ऐका, विजय तेंडुलकरलिखित आणि मंगेश कदम यांनी दिग्दर्शित केलेलं नाटक 'कन्यादान' स्पृहा जोशी, अद्वैत दादरकर, लीना भागवत यांच्यासह!