स्टीफन विल्यम हॉकिंग (जानेवारी ८, १९४२ - १४ मार्च, २०१८:कॅम्ब्रिज, इंग्लंड) हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ होते. त्यांची पुस्तके आणि जाहीर कार्यक्रम यांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. ते रॉयल सोसायटी ऑफ आर्टसचे मानद सदस्य होते. सन २००९ मध्ये त्यांना प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेले. केंब्रिज विद्यापीठात तीस वर्षे त्यांनी ...