लुई पाश्चर (डिसेंबर २७,१८२२-सप्टेंबर २८,१८९५) हा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होता. तो प्रामुख्याने अनेक रोगांची कारणे व त्यांच्यापासून बचाव यामध्ये केलेल्या अमूलाग्र शोधांसाठी ओळखला जातो. याने देवी या रोगावरील लस शोधून काढली.
लुई पाश्चर यांच्या वैद्यकीय शोधांमुळे रोगांच्या सूक्ष्मजंतूचा सिद्धांत आणि क्लिनिकल औषधांमध्ये त्याचा वापर करण्यास थेट मदत मिळाली. बॅक्टेरियाचा संसर्ग थांब...