गॅलेलियोचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला.गॅलिलिओने पहिली चार वर्षे शिक्षण भिक्षूंच्या मठात घेतले. त्यानंतर ते फ्लॉरेन्स या शहरात गेले. त्यांच्या वडिलांनी पिसाच्या विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी धडपड सुरू केली. त्यांची इच्छा होती की गॅलिलिओने डॉक्टर बनावे. इच्छा नसूनही गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. त्यांची खरी ओढ गणिताकडे होती. तसेच विज्ञान प्रयोगाच्या आधारावर रहावे असे त्यांना वाट...