भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा सन्मान एक समर्थ अभियंता म्हणून केला जातो. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला.ब्रिटीशांनी पण त्यांना,त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो. भारताच्या आर्थिक व...