सुब्रमण्यम चंद्रशेखर (१९१०-९५) ह्यांनी लिहून ठेवले आहे की, "भारतातील खगोलशास्त्र आणि आधुनिक विज्ञानाच्या इतिहासातील मेघनाद साहा ह्यांचे स्थान अद्वितीय आहे." साहा ह्यांचा औष्णिक मूलकीकरणाचा (थर्मल आयोनायझेशन) सिद्धांत, म्हणजे विसाव्या शतकातील जागतिक विज्ञानास भारताने दिलेले सर्वात महत्वाचे योगदान आहे. अवकाशीय वर्णपटाचे मूळ, ह्या सिद्धांताने स्पष्ट केले. त्या काळातील तो एक लक्षणीय शोध होता. एन्सायक्...