बेकर यांचं जीवन म्हणजे वास्तूकलेतील एकहाती अबोल क्रांती होती. बेकर यांना अभिप्रेत तत्त्वज्ञान त्यांच्या वास्तूमधून व्यक्त होत राहिले. हरित इमारत, पर्यावरणस्नेही बांधकाम, भूकंपरोधक घरे, सर्जनशील निवास असे वास्तूकलेतील कोणत्याही प्रांतात नव्याने काही घडले असेल, तर त्यावर बेकर यांचा प्रभाव अटळ आहे. साधारणपणे १९९०च्या दशकापासून अनेक तरुण भारतीय वास्तूकलेचा नव्याने अभ्यास करू लागले आहेत. या विद्यार्थ्य...