अडॉल्फ हिटलरला प्रेयसी होती. जवळजवळ मृत्यूच्या दारापर्यंत ती त्याची प्रेयसी म्हणून वावरली आणि मृत्यूच्या दाराअलीकडे काही अंतरावरच तिने पत्नी म्हणून 'सप्तपदी' अनुभवली. मृत्यूच्या सावलीत झालेलं हे जगावेगळं लग्न होतं. या स्त्रीचं नाव इव्हा ब्राऊ. तिने हिटलरसोबतच आत्मघात पत्करल्याने हिटलरच्या खासगी आयुष्याची ही एकमेव भागीदार आणि साक्षीदार काही सांगण्याकरता मागे उरलीच नाही. १४ वर्ष ती हिटलरसोबत राहिली,...