भारताचे भूतपूर्व उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म एका गरीब शेतक-याच्या घरात झाला होता. शिक्षणाची आवड, सततचा व्यासंग आणि बुध्दिमंतांच्या सान्निध्यातून मिळालेली वैचारिक समृध्दीचा वापर करून त्यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची कारकीर्द घडवली. ते एक सुसंस्कृत, संयमी, सौजन्यशील आणि भारद्स्त व्यक्तिमत्व होते. त्यांच्या भाषणांत यशवंतरावांच्या संसदपटुत्वाच्या...