"जमदग्नी, आयुष्यातल्या प्रत्येक बाबतीत रीसीविंग एंडला राहून वैतागला होता. शिवाय त्याच्या लहानपणी 'वडील घरदार सोडून दुसर्या बाईबरोबर मंगळावर गेले' ही गोष्ट त्याला नेहमीच अस्वस्थ करायची. पण शेवटी एक दिवस बॉसला थुका लावून मंगळावर जाण्याची 'ऑनसाईट' ऑपॉर्चुनिटी त्याने मिळवलीच.