काहीवेळा अतिमानवी म्हणजे आपल्याला आकलन होऊ शकत नाही, किंवा मानवी शक्तीच्या पलीकडच्या गोष्टी घडत असतात, त्यांना कोणतेही वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येत नाही. तशीच ही एक गोष्ट आहे. खुनाचा बदला-खून अशा सत्य घटना घडतच असतात. एका गृहस्थाच्या बंगल्यात, भिंतीवर एक मानवी हात बंदिस्त करून ठेवलेला असतो. तो ज्या व्यक्तीचा असतो, त्याच्या पूर्वजन्मात अशी कुठली गोष्ट घडली की, त्याचा सूड घेण्यासाठी तो टपलेला आहे?