कामानिमित्त रेल्वेने लंडनला परत जाऊन आलेल्या एकाला न्यायला, त्याचा चालक त्याच दिवशी घेतलेली अलिशान चार चाकी गाडी घेऊन येतो. घरापर्यंतचे अंतर काही मैलाचे पण वाटेत धोकादायक वळणे असलेला घाट आहे. चालकाला न जुमानता मालक स्वतःच नविन गाडी चालवायला घेतो. अवघड रस्ता पार करून त्याला समोर त्याचा बंगला दिसायला लागतो तितक्यात...!