श्री रमण महर्षींना भारतातील सर्वाधिक महत्वाच्या सार्वकालिक ऋषींमध्ये स्थान दिले जाते. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांना अध्यात्मिक जागृतीचा अनुभव आला त्यानंतर ते अरूणाचलाच्या पवित्र पर्वतरांगांमध्ये गेले. त्यांच्याभोवती शिष्यांचा परिवार गोळा झाला आणि बघता बघता त्यांची संख्या वाढत गेली. तिथे त्यांच्या सान्निध्यात आलेल्या कार्ल युंग, हेन्री कार्टियर -ब्रेमेन, सॉमरसेट मॉम यांसारख्या प्रभावी लेखक, कलाकार...