'तळ्यात पोरीचं प्रेत!'... या बातमीनं आंदळगाव दणाणलं. इरसाल गावातल्या या लडतरीचा छडा लावायला तात्यानं शड्डू ठोकला. शेरलॉकचा किडा चावलेला हा म्हातारा म्हणजे अनेक उन्हाळं पावसाळं कोळून प्यायलेला चिरतरुण गडी. हा महावस्ताद, खवाट तात्या या झेंगाटाची पालं-मुळं कशी हुडकून काढतो तेची ही अंतरंगी कथा.