शांतता…कोर्ट चालू आहे! केवळ विरंगुळा म्हणून काढलेल्या एका खेळात, एका निष्पाप जिवाला सहज रक्तबंबाळ करण्याइतकं जे अमानुष कौर्य या समाजाच्या ठायी आहे, ते भयानक आहे. काही प्रचंड महत्त्वाकांक्षी किंवा सूडापोटीसुद्धा आलेलं हे कौर्य नाही. किंबहुना, नेहमीच बाईला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याऱ्या या कौर्याच्या भयानकतेची जाणीवही समाजाला नाही. समाजासाठी, ही घटकाभर करमणूक पण जिला या कोर्टात उभं केलंय त्या बे...