तळघरातल्या एका अंधाऱ्या बेकरीत सव्वीसजण गुलामासारखे राबत असतात. बाहेरचा उजेड बघण्याचं भाग्य त्यांच्या नशिबी क्वचितच येतं. एवढं करूनही दोन वेळच्या निकृष्ट जेवणापलीकडे त्यांना काही मिळत नाही. या सगळ्यात त्यांना आनंद देणारी एकच गोष्ट होती - शेजारच्या दुकानात काम करणारी एक गोड तरुण मुलगी रोज सकाळी काही मिनिटांसाठी त्यांच्या बागेला भेट देते. सर्वजण फक्त तेवढ्याच सुखाची दिवसभर वाट पाहत असतात. तेव्हा त्य...