सत्य सांगायचे तर ही एका अशा संन्याशाची कथा आहे ज्याने खूप कमी वयातच कोट्यावधीची संपत्ती कमावली आणि नंतर तो संन्यासी बनला. वयाच्या १८ व्या वर्षी ऑस्ट्रेलियात जाऊन लाखो डॉलर्स मिळवणा-या या युवकाला सुरूवातीला भौतिक संपन्नता मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. पण अनेक वर्षे ऐषोरामात घालवल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आंतरिक अस्वस्थतेकडं दूर्लक्ष करणे शक्य नाही. अखेर तो भारतात परत आला आणि ज्यासाठी...