चीनी तिबेटमध्ये जाऊन लडाखमध्ये घुसखोरी करण्याच्या योजनेच्या सूत्रधारालाच ठार मारण्याची अत्यंत धाडसी कामगिरी समीर चक्रवर्तीवर आली खरी पण या वेळेस सारे काही सोपे नव्हते. तिबेटच्या भयाण थंडीत आणि दुर्गम प्रदेशातून चीनी लष्करापासून जीव वाचवत दूर पळत असताना समीर अनपेक्षितपणे एका वेगळ्याच गूढ आणि रहस्यमय प्राचीन खजिन्याच्या जीवघेण्या शोधात सापडला.
कोणाचा होता हा खजिना? त्याचा भारताशी काय संबंध होता? कोण ...