हिंसा, कौर्य, भीती, जगण्याचा संघर्ष, लैंगिकतेची चर्चा अशा जगण्याच्या सगळ्याच अंगांना सामावून घेणारी तेंडुलकरांची काही नाटकं अजरामर आणि प्रचंड वादग्रस्तही ठरली. त्यापैकीच एक 'सखाराम बाईंडर'. मराठीतलं एक माईलस्टोन नाटक. तेंडुलकरांचा 'सखाराम' रंगमंचावर पाहणं हा नाट्यप्रेमींसाठी समृद्ध करणारा अनुभव. आज प्रत्यक्ष रंगमंचावर या नाटकाचा अनुभव घेणं जवळपास दुरापास्त झालं आहे, म्हणूनच हा ऑडिओ नाट्याअनुभव खास...