महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या निवडक भाषणांचा हा पहिला अधिकृत संग्रह आहे. या संग्रहांत महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या काळांतील त्यांच्या भाषणांचा मुख्यतः समावेश केलेला असला तरी द्विभाषिक मुंबई राज्याचे ते मुख्यमंत्री असतांना त्यांनी केलेल्या कांहीं भाषणांचाहि त्यांत अन्तर्भाव करण्यांत आला आहे.
मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पांच वर्षांच्या काळांत अ...