ईश्वरी शक्ती मानणा-या भक्तांमध्ये ईश्वराच्या आस्तित्वाबदद्ल सगुण आणि निर्गुण असे दोन प्रवाह आढळतात. निर्गुण या शब्दातच गुण रहितता सामावली आहे त्यामुळे ज्याला रूप नाही, ज्याला रंग नाही व ज्याला आकार नाही तो निर्गुण परमात्मा असे ईश्वराचे स्वरूप आणि जो ईश्वराच्या रूपाने भक्तांच्या कामासाठी नावारूपाला आला आणि ऐश्वर्य, ज्ञान आणि औदार्य या रूपाने साकार झाला तो सगुण परमात्मा असे मानले जाते. अनेक संतांनी ...