देशाला परम वैभवाला नेण्याचे लक्ष्य रा. स्व. संघाने ठेवले आहे. संघाचा विचार आणि दृष्टिकोन वेळोवेळी संघाने विविध माध्यमांद्वारे समाजासमोर ठेवला आहे. 'राष्ट्र जागरण अभियान' निमित्ताने 'राष्ट्रीय आंदोलने आणि संघ' ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. भारतीय राष्ट्रजीवनात आजवर जी आंदोलने झाली, त्या वेळी, त्या आंदोलनांमध्ये संघाचा सहभाग कशाप्रकारे राहिला याचे सविस्तर विवेचन या पुस्तिकेत आपणास ऐकायला मिळेल.