प्रा. शरद हेबाळकरांनी अतिशय सोप्या भाषेत आणि छोट्या छोट्या गोष्टी सांगून रोजच्या शाखेचे आणि तीवर म्हटल्या जाणार्या प्रार्थनेचे महत्त्व सांगितले आहे. एखादा गंभीर विषय सोप्या शब्दात कसा मांडता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक आहे. ही प्रार्थना वैयक्तिक नसून सामुहिक प्रेरणेचा हुंकार आहे.