ब्रिटीश भारतातून जात असताना इथे फाळणीची बीजं रोवून गेले. कालांतराने भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. या फाळणीपुर्वीची भारतातली सामाजिक, राजकीय परिस्थिती, फाळणीनंतरची परिस्थिती, त्यामागील कारणं, फाळणीदरम्यान झालेलं वित्तीय, मानवी नुकसान आणि भारताच्या राजकीय इतिहासावर झालेला त्याचा दूरगामी परिणाम यांचा सांगोपांग वेध घेणारं वि.ग.कानिटकर यांचं पुस्तक म्हणजे 'फाळणी - युगान्तापुर्वीचा काळोख...