उजाड होत चाललेली खेडी आणि तेथील माणसाचं जिकीरीचं जगणं ,हे लेखकांनी समर्थपणे मांडले आहे." पाणी "या प्रश्नाने आज अनेकांची झोप उडवली आहे . आशा वेळी धन-लांडग्यांनी गरिबांचे पाणी तोडणे , फळबाग योजनांचा मलिदा फक्त श्रीमंतानीच घेणे , रोजगार हमीत स्त्रियांची होणारी घुसमट , भूकबळी झालेल्या व्यक्तीला कागदपत्रांच्या आधाराने आजारी ठरवणे, या-ना त्या मार्गाने पैसे मिळवण्याची नशा , दोन घोट पाण्यासाठी गेलेला म्हा...