प्रेयस आणि श्रेयस यातून माणसाला नेहमी योग्य ती निवड करावी लागते. भौतिक सुखसमृद्धी की ज्यातून अंतिम हित साध्य होतं असं जीवन? असाच संघर्ष दाखवणारी ही एक विलक्षण गोष्ट आहे. दोन व्यक्तींमध्ये एक चमत्कारिक पैज लागते. ती जिंकणाऱ्याला अगणित संपत्तीचा लाभ होणार असतो. अखेर जे काही घडतं ते अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. आपल्याला गंभीरपणे त्यावर विचार करायला भाग पाडणारं आहे! ऐका, 'पैज' गौरी लागूंच्या आवाजात.