समाजातील गंभीर, कूट प्रश्नांच्या संशोधनात आणि त्यांच्या सोडवणूकीच्या प्रयत्नात तेंडूलकरांना रस आहे. माणूस म्हणून आणि एक नागरिक म्हणून ते अशा प्रयत्नात सामीलही होतात.
पाहिजे जातीचे या नाटकात जास्त शिक्षणाने बेकार झालेल्या एका ग्रामीण, गरीब, प्राध्यापकाचे चित्रण आलेले आहे. शिक्षणामुळे हातात पेन धरण्याची सवय असलेल्या त्याला प्रसंगी प्रतिकारासाठी दंडुकाही धरता येत नाही.