आंद्रे आगासी - इतिहासातील अत्यंत लोकप्रिय क्रीडापटूंपैकी एक. टेनिसमधील कौशल्यासाठी आणि यशासाठी ज्याचा मनस्वी हेवा करावा, असा हा आंद्रे आगासी त्याच्या लहानपणी याच टेनिसचा विलक्षण तिरस्कार करीत होता! पाळण्यातही त्याला खेळायला टेनिसची रॅकेटच दिली जात होती. प्राथमिक शाळेत असतानाच रोज शंभर चेंडू रॅकेटने मारण्याची सक्ती केली जात होती. एका बाजूला 'लहान वयात मोठी कामगिरी करणारा असामान्य मुलगा,' अशी ख्याती...