अनावधानाने चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी हजर राहिल्याने आयुष्याची परवड झालेल्या माणसाची हि कहाणी. समृद्धीच्या नादात माणूस देशांतर करतो पण त्याचबरोबर उपरेपणाची चोरटी भावना त्याच्या मनात शिरकाव करते आणि मानगुटीवर बसते तेव्हा स्वतःच्या अस्तित्वाविषयीच संदेह निर्माण होतो. या कादंबरीतील नायक , इरफान असाच नात्याचे एक एक धागे नकळत उसवत जातो आणि सर्वार्थाने एकटा पडतो. ऐका ! स्टोरीटेलवर , अनघा केसकर लिखित ...