दर शंभर वर्षांनी एखाद्या महाभयंकर रोगाची साथ सा-या जगाला ग्रासून टाकते असा इतिहास आहे. अशाच एका प्राणघातक साथीला आपणही नुकतेच तोंड दिले आहे. अशाच एका महाभयंकर साथीला तोंड देण्यासाठी एका देशाचा धाडसी राजपूत्र निवडक लोकांना घेऊन एका सुरक्षित जागी स्थलांतर करतो. काही दिवस ते सगळे आनंदात आमि मौजमजेत घालवतात. पण हा काळरूप रोगदानव त्यांना आपल्या पाशातून सोडेल का ?