संगम'च्या राधाच्या भूमिकेसाठी वैजयंतीमाला काही होकार देत नव्हती. मग राजकपूरने तिला तार केली 'बोल राधा बोल संगम होगा के नही?' त्यावर वैजयंतीमालानं उलट तयार पाठवली 'होगा होगा होगा!' आणि त्यावरून तयार झालं एक अजरामर गाणं! मेकिंग ऑफ क्लासिक्स' मध्ये तुम्ही ऐकाल संगम घडवताना घडलेल्या मजेदार गोष्टी .