राजाने प्रजेच्या कल्याणाचा विचार करावा की स्वत:चा ऐषाराम, शौक पुरा करावा? अशाच एका राजाला एकसारखे नवनवीन कपडे घालण्याचं वेड आहे. त्यातच त्याचा संपूर्ण दिवस जातो. दरबारात जायला त्याला वेळच होत नाही. एकदा त्याच्या राज्यात दोन प्रवासी येतात. आपण उत्तम विणकर आणि आधुनिक वस्त्रे बनवणारे शिंपी आहोत, असा त्यांचा दावा आहे. राजाला ते उत्तम महावस्त्रे बनवून देण्याचे आश्वासन देतात. त्यासाठी रेशमी धागे, सोने आ...