केवळ भारताचाच नव्हे, तर साऱ्या वैश्विक मानवी व्यवहारांचा आरसा असलेलं महाभारत पुन्हा पुन्हा वाचलं, तरी प्रत्येकवेळी नवी दृष्टी देऊन जाते. वि. ग. कानिटकर यांनी या पुस्तकात महाभारताची कथा रसाळपणे सांगितली आहे. सर्व रसांचं अद्भुत कॉम्बिनेशन असलेलं महाभारत मानवी मनं, भावभावना, नातेसंबंध, हिंसा आणि शांती यांचं 'बर्ड आय व्यू' दर्शन घडवतं. आदिपर्व, सभापर्व, वनपर्व, विराट पर्व, उद्योग पर्व, भीष्म पर्व, द्र...