रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : व्यंकू
व्यंकू म्हणजे माझ्या थोरल्या काकूचा मोठा भाऊ. साधारण ४०- ४५ वर्षाचा ! तो आला की बाकी कोणाशी न बोलता , न हसता सरळ स्वयंपाकघरात कााम करत असलेल्या काकूसमोर जाऊन उभा राहत असे. काकूपेक्षा मोठा असून तो अविवाहित होता. खरं तर त्याच्यापेक्षा बावळट माणसांची लग्ने होऊन पोरंही झाली होती पण त्याचे लग्न कोणीच मनावर घेत नसे. व्यंकूचा जन्म विजापूरचा. तो लहान असताना रात्री र...