रघुवीर कुल यांनी अनेक माणसे अगदी जवळून पाहिली आहेत की ती केवळ वल्ली नाहीत तर विलक्षण भन्नाट आहेत. ती फक्त असामान्य नव्हे तर अचाट आहेत. काही माणसे वरवर पाहिली तर विकृतही वाटू शकतील पण ती विकृत नाहीत. ती जीवनाच्या चौकटीत, प्रतिष्ठितपणाच्या तथाकथित अभिजन वर्तुळात वा सर्वसाधारण मध्यमवर्गीय संकेतांनुसार वागत नाहीत इतकेच. यातील काही व्यक्तिमत्वांच्या तर अगदी आपण प्रेमात पडतो. रमेश हे असेच एक रघुवीर कुल ...